शिर्डी लोकसभा मतदारसंघसाठी 20 उमेदवार रिंगणात

निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांना चिन्ह वाटप

अहमदनगर : पोलिसनामा आॅनलाईन – निवडणूकीच्या रिंगणात अर्ज माघारीनंतर आता 20 उमेदवार राहिले आहेत. या उमेदवारांना आज भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक विरेंद्रसिंह बांकावत यांच्या उपस्थितीत चिन्ह वाटप करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी तथा 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी नियमानूसार या उमेदवारांना चिन्ह वाटप केले.

अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात असलेल्या व त्यांना देण्यात आलेली चिन्हे पुढीलप्रमाणे- कांबळे भाऊसाहेब मल्हारी (इंडियन नँशनल काँग्रेस- हात), ॲड. बन्सी भाऊराव सातपुते (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया – कणीस आणि विळा), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना- धनुष्यबाण), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी- हत्ती ), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी-बॅट), ॲड. प्रकाश कचरु आहेर

(बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-एअर कंडिशनर), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना- ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी- कप आणि बशी), ॲड. अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष – ट्रक ), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष- हेलीकॉफ्टर), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष – गॅस सिलेंडर), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष – खाट), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष-शिट्टी), बापू पाराजी रणधीर (अपक्ष – डिश एंटिना), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष-बादली), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष-कपाट), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष-ऊस शेतकरी), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष – रोड रोलर), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष- किटली), संपत खंडू समिंदर (अपक्ष- स्टुल) यांचा समावेश आहे.

Loading...
You might also like