अबब ! … तर ‘इन्कम टॅक्स’ डिपार्टमेंट २० कोटी नागरिकांचे PAN कार्ड रद्द करणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही तात्काळ पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर ते यापुढे निष्क्रिय ठरणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ३० सप्टेंबर २०१९ ही अंतिम तारीख दिली असून या तारखेच्या आत हि कामे करण्यास सांगितले आहे. डेडलाइनच्या आधी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलं नाही तर इनकम टॅक्सच्या नियमांनुसार ते कार्ड अवैध मानलं जाईल.

अशा प्रकारे करा लिंक

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन लिंक आधार या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही आधार आणि पॅन लिंक करू शकता. www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती आणि लिंक करण्याचे पर्याय मिळतील. त्यानंतर दिलेल्या पर्यायावर जाऊन तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्डचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

मोबाईलवर देखील करा लिंक

यासाठी तुम्ही एसएमएस वर आधारित असलेली सेवा वापरू शकता. ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर एसएमएस करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. सध्या भारतात ४३ कोटी नागरिकांकडे पॅन कार्ड असून १२० कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहेत. त्यामुळे आता सर्वांसाठी आधार आणि पॅन लिंक करणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय