धक्कादायक ! ‘ओलिस’ ठेवून 46 मजुरांकडून 20 दिवस करून घेतले काम

चायल (अलाहबाद) :  पिपरी परिसरातील घुरीपुर गावातील एका भट्टीवर 16 कुटुंबातील सुमारे 46 मजुरांना 20 दिवस ओलिस ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यास विरोध केल्याने त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. एका कामगाराच्या तक्रारीनंतर एससी, एसटी आयोगाच्या अध्यक्षांनी गंभीर दखल घेतल्यानंतर गुरूवारी संध्याकाळी उशीरा प्रशासकीय अधिकार्‍यांना जाग आली. यानंतर मजुरांची सुटका करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

प्रयागराच्या केरली येथील एकाने वीटभट्टी सुरू केली आहे. या वीटभट्टीवर बदायू जनपदच्या कामगार क्षेत्रातून आलेल्या 16 कुटुंबातील सुमारे 46 मजुरांना ओलिस ठेवून त्यांच्याकडून काम करून घेण्यात येत होते, असा आरोप आहे. आजारी असतानाही महिला आणि पुरूषांकडून काम करून घेतले जात होते. विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण केली जात होती. 29 डिसेंबरला संध्याकाळी यापैकी एक मजूर दयाराम हा संधी साधून तेथून निसटला. यानंतर तो दिल्लीला पोहचला आणि त्याने एसटी, एसटी आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली.

आयोगाचे अध्यक्ष रमाशंकर कठेरिया यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कौशाम्बी यांना पत्र पाठवले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर गुरूवारी संध्याकाळी जिल्हा कामगार अधिकारी आराधना शुक्ला, चायलचे उपजिल्हाधिकारी ज्योती मौर्य यांचे पथक त्या वीटभट्टी पोहोचले. नंतर या मजूरांची सुटका करून त्यांचे जबाब घेण्यात आले.

नंतर या मजुरांना सकाळी घरी पाठविण्यात आले. एसडीएम ज्योती मौर्य यांनी सांगितले की, मजूरांना ओलिस ठेवून काम करून घेतले जात नव्हते. तेच काम न करता पैसे मागत होते. यावरून त्यांचा वीटभट्टी मालकासोबत वाद सुरू होता. सर्व मजुरांना सुरक्षित घरी पाठविण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/