२० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

फसवणुकीचे बळी पडलेले व सरकारी वर्दी चोरीला गेलेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून त्यांच्याकडे ट्रायल मॉनिटरिंग सेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीही बदलण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’417694a2-a09d-11e8-b1a5-b7c86aa5f34c’]

पोलिस ठाणेनिहाय नवीन नियुक्त अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे: पाथर्डी- रमेश रत्नपारखी, डीएसबी- राजेंद्र पाटील, सुपा- राजेंद्र चव्हाण, कर्जत- राजेंद्र भोसले, कोपरगाव शहर- राकेश मानगावकर, शिर्डी शहर वाहतूक शाखा- गोकुळ अवताडे, श्रीरामपूर शहर- श्रीहरी बहिरट, राहाता- अरुण परदेशी, लोणी- प्रवीण पाटील, सायबर- बाळकृष्ण कदम, शनिशिंगणापूर- ललित पांडुळे, घारगाव- अंबादास भुसारे, श्रीरामपूर तालुका- दौलत जाधव, आर्थिक गुन्हे शाखा- अनिल कटके, मानव संसाधन- वसंत पथवे, एएसटीयु- वसंत भोये, दहशत विरोधी सेल- विकास वाघ, ट्रायल मॉनिटरिंग सेल- गोविंद ओमासे, नियंत्रण कक्ष- दिलीप निघोट.

जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची आज दुपारी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बदल्या केल्या आहेत. फसवणुकीचे बळी ठरलेले व त्यानंतर सरकारी वर्दी चोरीस गेल्याची फिर्याद देणाऱ्या ओमासे यांची शेवगाव येथून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.