पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात आत्महत्या सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसत असून, सिहंगड भागात आज एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

यश शिवाजी खोपडे (वय 20, रा. नर्हे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याला पेंटिंग करण्याचा छंद होता. त्याच्या मित्रांनी नर्हेत एक रूम भाड्याने घेतली होती. ते याठिकाणी राहत होते.
त्यानंतर बुधवारी रात्री उशीरा यश फ्लॅटवर आला होता. गुरुवारी सकाळी त्याचे मित्र या ठिकाणी आले. त्यांनी दार वाजवले.पण तो दार उघडत नव्हता. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी यशने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती सिहंगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like