तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे शनिवारी (दि. 3) सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरती जयप्रकाश चटपल्लीवार (वय 20 रा. बाजारवार्ड, भद्रावती) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरतीने राहत्या घरी छताला ओढनी बांधून गळफास घेतला. सायंकाळी आईने तिच्या रुममध्ये जाऊन पाहिले असता, ही घटना उघडकीस आली. भद्रावती पोलीस तपास करीत आहे.