3 मुलांसह मुलीनं 12 वीच्या विद्यार्थीनीकडं केली ग्रुप सेक्सची मागणी, तिनं उचललं ‘हे’ पाऊल अन् पुढ ‘असं’ झालं

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वांकानेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मुलीला ग्रुपसेक्ससाठी ब्लॅकमेल केल्याने तिने स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी हि 12 वीत शिक्षण घेत होती. तिच्या घरी तिची आई मजुरी करत होती तर वडील बिगारी काम करतात.

जितेंद्र मकवाणा, राहुल व्होरा, अखिल परमार आणि गौरी उभडिया अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी संध्याकाळी या मुलीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. या मुलीने मृत्यूप्रकरणी एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, जितेंद्रने आपल्यासोबतचा किसिंग करतानाच व्हिडीओ चोरून काढला होता. ताईने तो व्हिडीओ इतर आरोपींना देखील दाखवला. त्यानंतर त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करत ग्रुप सेक्सची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने जाळून घेत आत्महत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी राहुल आणि गौरी या दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com

You might also like