‘बायसिकल शेअरिंग’च्या अंतर्गंत  पिंपळे गुरव, पिंपळे सौदागारसाठी २०० सायकली

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात २०० सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार असून हा प्रकल्प १५ ऑगस्टला सुरु करण्याचे नियोजित आहे.

[amazon_link asins=’B077Y2D3NM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7238b302-83f3-11e8-bb49-df9c00ec11cb’]

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘बायसिकल शेअरिंग’ ही योजना राबविण्याच्या नियोजनाची बैठक आयुक्त दालनात नुकतीच पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व विविध सायकल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर व परिसरात ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेकरिता नाममात्र दरात सायकली उपलब्ध करुन देण्याची यूलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे.

नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बीआरटीएस मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. याशिवाय अनेक उच्चभ्रू सोसायट्यांच्या आवारात सायकली उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

You might also like