काय सांगता ! होय, विवस्त्र होऊन 200 कैदी फरार, सैन्यही काही करू शकले नाही

कंपाला : वृत्तसंस्था – आफ्रिका खंडातील युगांडा या देशात एक धक्कादायक घटना घडली आहे. युगांडामधील २०० कैदी विवस्त्र होऊन तुरुंगातून पळून गेले आहेत. या कैद्यांनी तुरुंगाच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना ताब्यात ठेवले आणि नंतर स्वत:चे कपडे काढून तुरुंगातून पळून गेले. ही घटना बुधवारी घडली. युगांडामधील कैद्यांना पिवळे कपडे घातले जातात,

या कपड्यांमुळे सैन्य त्यांना सहज पकडतील अशी त्यांना भीती होती म्हणून त्यांनी विवस्त्र होऊन तुरुंगातून पळ काढला. सुरक्षा दलाचे जवान या कैद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कैदी जंगलातुन पळून गेले. तुरुंगातून पळून जात असताना कैदी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये गोळीबार सुद्धा झाला. या गोळीबारात १ सैनिक व २ कैदी ठार झाले आहेत. हा तुरुंग मोरोटो जिल्ह्यातील सैन्याच्या छावणीजवळ आहे.

कैद्यांनी तैनात असलेल्या वॉर्डनला ताब्यात घेतले.या तुरुंगातील कैदी हे कुख्यात अपराधी आहे. पशुचोरीच्या आरोपाखाली त्याना अटक करण्यात आली होती. पळून गेल्या कैद्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या फरार कैद्यांकडून एखाद्या कपड्यांच्या दुकानांवर हल्ला केला जाऊ शकतो अशा इशारा लष्कराने दिला आहे.