2000 Rupees Note |  नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश, पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन हजार रुपयांची नोट (2000 Rupees Note) चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने (RBI) घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत (Clean Note Policy) आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांचं (2000 Rupees Note) सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया देताना, मागच्या नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाप्रमाणे हा नोटबंदीचा निर्णयही बालिश असल्याचे म्हटले आहे.

मागली नोटाबंदीच्या वेळी तीन मोठी उद्दिष्ट होती. पाकिस्तानचा दहशतवाद (Pakistan’s Terrorism) बंद होईल, भ्रष्टाचार (Corruption) बंद होईल, काळा पैसा (Black Money) नष्ट होईल, मात्र यापैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालं नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मागील नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वत: मोदी अक्षरश: तोंडघशी पडले, नोटबंदी करण्यासाठी लोकांनी बँकांच्या बाहेर गर्दी केली आणि शेकडो माणसं मृत्यूमुखी पडल्याचे चव्हाण यांनी म्हटले.

सरकारच्या एका निर्णयामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येला मोठा त्रास झाल्याचे उदाहरण माझ्यासमोर दुसरं नाही,
अशा शब्दात चव्हाण यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला. नोटबंदीमुळे भारतातील कमीत कमी 120 कोटी लोक प्रभावित झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या वृद्धाला मागील नोटबंदीचा त्रास झाल्याची आठवण चव्हाण यांनी
करुन दिली. नोटबंदीमुळे कुणाला औषध घ्ययचं, कुणाला शाळेची पुस्तकं घ्यायची, कुणाला दूध-भाजीपाला
घ्यायला लोकांना त्रास झाला. त्यांना वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. जनतेला प्रचंड त्रास झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

महायुद्धातही जितकी लोकं प्रभावित झाले नाहीत, तितके एका नोटबंदीच्या निर्णयामुळे झाले.
नोटबंदीच्या निर्णयामुळे मूळ उद्दिष्ट साध्य न होता अर्थव्यवस्थेला (Economy) फटका बसल्याचेही चव्हाण
यांनी सांगितले. कर्नाटकच्या निवडणुकीत (Karnataka Elections) झालेल्या दारुण पराभवावरुन लोकांचं
लक्ष विचिलत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Web Title :  2000 Rupees Note congress leader and former chief minister prithviraj chavan criticize on 2000 currency note will be withdrawn from use

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 50 लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक ! कंपनी चालकाकडे Whatsapp Call करून केली होती ‘डिमांड’

पुन्हा नोटबंदी ! 2 हजाराची नोट बंद होणार, ‘या’ तारखेपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

RBI To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation | आरबीआयचा मोठा निर्णय ! 2000 च्या नोटा चलनातून बंद होणार, पण 30 सप्टेंबरपर्यंत राहणार वैध; जाणून घ्या नोटा कधी बदलता येणार अन् एका वेळी किती नोटा बदलता येणार?