अयोध्या दहशतवादी हल्ला : चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता

अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप या चौघांवर आहे.

रामजन्मभूमी परिसरात हल्ला करुन देशामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचे षडयंत्र या दहशतवाद्यांनी आखले होते. या हल्ल्यातले दहशतवादी राम भक्त बनून अयोध्येत शिरले होते. राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात येत होती. अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष कोर्टात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. यातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ४० हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला.

काय आहे प्रकरण –

५ जुलै २००५ रोजी सकाळी ९ च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट केला होता. यात दोन जण मारले गेले होते. तर काही सुरक्षा रक्षक जखमी झाले होते. तसेच परिसरात पोलीस व दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी ५ दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच हा बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना मदत करणाऱ्या इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूक या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर येथून अटक केली होती. त्यापैकी मोहम्मद अजीजची मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’