Coronavirus : राजधानी दिल्लीत 24 तासात 2008 ‘कोरोना’चे नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 2008 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 02 हजार 831 इतकी झाली आहे.

याशिवाय कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3165 जणांचा मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर मंगळवारी दिल्लीमध्ये 8795 आरटी-पीसीआर आणि 13653 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 679831 टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, राजधानीत मंगळवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2008 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह संक्रमणाचा आकडा 102831 वर पोहोचला आहे. सध्या दिल्लीत कोरोनाची 25449 लोक अॅक्टिव्ह आहेत. तर 74217 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3165 वर पोहचली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like