२०१९ च्या भाजप विजयाबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांना नाही खात्री 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदिराच्या मुद्दयांवर मोदींनी दिलेले स्पष्टीकरण आणि पाच राज्याच्या निकालाच्या कामगिरी वरून भाजपची सत्ता केंद्रात येईल का या बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला अंदाज मांडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपचा विजय होईल का याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान या शाळेच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत राम मंदिराबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हणले होते कि, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या शिवाय राम मंदिराचा वटहुकूम काढता येणार नाही असे म्हणले होते. त्यावर मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही म्हणो पण रामा प्रति आमची श्रद्धा अटळ आहे म्हणून अयोध्येत त्याच जागी राम मंदिर उभारण्यात यावे असे आम्हाला वाटते असे मोहन भागवत म्हणले आहेत.

आपण संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी मोदींच्या मुलाखतीवर दिलेल्या प्रतिक्रियेचे समर्थन करत आहोत असे मोहन भागवत यांनी म्हणले आहे. जोशी यांनी मोदींची मुलाखत पार पडताच त्यांच्या राम मंदिराच्या भूमिके बद्दल आपले मत व्यक्त केले होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मोदींची भूमिका मला सकारात्मक वाटते. कारण आम्ही पहिल्या पासूनच म्हणत होतो कि राम मंदिर बांधण्यासाठी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे असे भैय्याजी जोशी म्हणाले होते.

शैक्षणिक धोरणात बदल करायला हवेत. शिक्षणा संदर्भात जे नवे धोरण आखण्यात आले आहे ते राबवण्यासाठी आता खूप थोडा वेळ राहिला आहे. भविष्यात भाजप सत्तेवर आली तर त्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी होणार हे ठरणार आहे.  यातून त्यांनी लोकसभेची निवडणूक भाजप जिंकणार कि नाही याबद्दल खात्री नसल्याचे दाखवून दिले आहे.

दरम्यान संघ परिवाराकडून राम मंदिराच्या मुद्दयांच्या निमित्ताने सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारला आरएसएस कडून सतत राम मंदिराची आठवण करून दिली जाते आहे. राम मंदिराच्या मुद्दयांवर विश्व हिंदू परिषदेने हि आता आक्रमक झाली असून न्यायालयाच्या निकालपर्यत हिंदू समाज वाट पाहू शकत नाही असे सूचक विधान विश्व हिंदू परिषदेने केले आहे. तर ३१ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या धर्म संसदेच्या कार्यक्रमाला इतिहासात पहिल्यांदाच मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.