वर्ष संपण्यापूर्वी आवश्य पहा 2020 चे 5 लोकप्रिय इंटरनॅशनल ‘वेब शो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात 2020 केव्हा संपले कळलेच नाही. सुरू वातीचा काही काळ कोरोनाच्या भितीमध्ये गेला, नंतर लॉकडाऊन आणि आता अनलॉकची प्रक्रिया होता-होता 2021 उंबरठ्यावर उभे आहे. हे वर्ष पूर्णपणे डिजिटल वर्ल्डचे होते, देशापासून जगापर्यंत यावर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर शानदार चित्रपट, वेब शो आले. वेब सीरीजच्या बहाण्याने लोकांची वेळसुद्धा सरली आणि खुपकाही शिकायला आणि पहायला मिळाले. स्थानिक वेब सीरीजपेक्षा जर तुम्हाला इंटरनॅशनल शो आवडत असतील, तर वर्ष संपण्यापूर्वी हे 5 शो तुम्ही आवश्य पाहिले पाहिजेत.

1. The Crown
ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या जीवनावर आधारित नेटफ्लिक्सचा द क्राउन सर्वात लोकप्रिय वेब शो आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये या शोचा चौथा सीझन आला होता. या सीझनची सर्वात विशेष बाब म्हणजे यावेळी प्रिंसेस डायना आणि ब्रिटिश पीएम राहिलेल्या मार्गारेट थॅचर यांच्या पात्रांबाबत दाखवले गेले. ज्या अभिनेत्रींनी या भूमिका केल्या, त्यांनी यामध्ये जीव ओतून काम केले. शो मध्ये मोठ्या प्रमाणात खरे जीवन दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

2. The Queen’s Gambit
वर्षाच्या अखेरीस आलेल्या नेटफ्लिक्सच्या या शो ने इतिहास रचला आहे. चेस गेमवर आधारित या मिनी सीरीजला जगात सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या वेब शो मध्ये समाविष्ट केले गेले आहे. या शो च्या नावावर एक रेकॉर्ड आहे की, हा 6 कोटीपेक्षा जास्त कुटुंबियांनी पाहिला आहे, शो आल्यानंतर जगात चेसची मागणी वाढली आहे, लोक फोनवर चेसची चर्चा करत आहेत आणि अ‍ॅप डाऊनलोड करून खेळत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा या शोला आपल्या स्पेशल लीस्टमध्ये स्थान दिले आहे.

3. Better Call Saul
ऐतिहासिक टीव्ही शो ब्रेकिंग बॅडच्या एका भूमिकेवर आधारति बेटर कॉल सॉल चा यावर्षी पाचवा सीझन आला. एक संघर्षमय जीवन जगत असलेला वकील जो नेहमी अपयशी ठरतो, त्याची कहानी या शोमध्ये दाखवली आहे. या शोचे एकुण पाच शो आहेत. जर तुम्ही पहायला सुरूवात कराल तर पहातच राहाल.

4. Trial by Media
अमेरिकन टीव्ही जगत अनेक असे शो आणि सीरीज काढते, जे सत्य घटनांवर आधारित असतात. ट्रायल बाय मीडियामध्ये अमेरिकन इतिहासातील काही अशा घटना दाखवण्यात आल्या, ज्यामध्ये एखादा न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वीच मीडियामध्ये खळबळ पसरली. आणि पूर्ण इमेजच बदलून गेली. मे 2020 मध्ये आलेल्या या वेब शोचे एकुण 6 एपिसोड आहेत, ज्यामध्ये वेगवेगळी कहानी दाखवण्यात आली आहे.

5. The Boys
अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपर हिरोजची चर्चा होणे सहाजिकच आहे. प्राइमला रिलीज झालेल्या द बॉईज ची कथा सुद्धा अशीच आहे, यावर्षी शोचा दुसरा सीझन आला. ज्याने भारतीय तरूणांमध्ये जास्त के्रझ पसरवली. हा शो एका कॉमिक सीरीजवर आधारित आहे, ज्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फाईट, कॉमेडी जॉनर च्यासह हा शो भारतात अनेक बॉलीवुड स्टार्सने हिंदीत डब केला होता. बराक ओबामा यांनी आपल्या लिस्टमध्ये यालाही स्थान दिले आहे.