‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच चित्रपट ‘सरदार उधमसिंह’ च्या बायोपिकची घोषणा केली गेली आहे. या चित्रपटात विकी कौशल हा अभिनेता मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट गांधी जयंतीदिवशी २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. याची घोषणा चित्रपटाच्या अधिकृत ट्विटरवर केली गेली आहे. या घोषणेसोबतच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर अजून एक चित्रपट ‘रॅम्बो’ त्याचदिवशी प्रदर्शित होणार आहे. मागच्या महिन्यात चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंदने ‘रॅम्बो’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली होती. अभिनेता टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’ चित्रपटही गाधी जयंतीदिवशी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी दोन चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर होणार आहे.

‘सरदार उधमसिंह’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये विकी कौशलने लांब कोट घातला आहे. चित्रपटात विकी सरदार उधम सिंह यांची मुख्य भूमिका साकारत आहे. हे गदर पार्टीचे क्रांतीकारक होते. ज्यांनी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडचे दोषी जनरल डायरची इंग्लडमध्ये जाऊन हत्या केली होती. एका मुलाखतीत चित्रपट निर्मात्याने सांगितले की, ‘हो, मी हा चित्रपट २ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित करणार आहे. चित्रपटाची शुटिंग आणि याचे पोस्ट प्रोडक्शन कामामध्ये लागणाऱ्या वेळेला पाहून आम्ही या तारखेची निवड केली आहे. चित्रपटाच्या टिमने मिळून हा निर्णय घेतला आहे. ‘

View this post on Instagram

Like a dark cloud with silver lining…

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

‘सरदार ऊधम सिंह’ चित्रपटाची तारीख ठरली आहे. या दिवशी बॉक्स ऑफीसवर टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’ चित्रपट टक्कर देणार आहे. टायगरचा हा चित्रपट हॉलीवुड स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा ब्लॉकबस्टर ‘रॅम्बो’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे निर्देशन सिद्धार्थ आनंद करणार आहे. यासोबतच सिद्धार्थ आनंद टायगर आणि ऋतिकसोबत एक एक्शन चित्रपट ‘फाइटर्स’ बनवत आहे. याला यशराज बैनर प्रोड्यूस करणार आहे.

एका मुलाखतीत सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले की, टायगर श्रॉफ आणि ऋतिक रोशनसोबत ‘फाइटर्स’ चित्रपटाचे शुटिंग संपताच मी ‘रॅम्बो’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची शुटिंग आम्ही देशात वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

#YogaDay2019 : अपचनाचा त्रास आहे? वज्रासन केल्यास मिळेल आराम

#YogaDay2019 : निरोगी व आकर्षक चेहऱ्यासाठी सर्वोत्तम मार्ग ‘फेस योगा’

Loading...
You might also like