2020 मध्ये ‘राहु’च्या चालीची ‘अडचण’, ‘या’ 4 राशींवर असणार ‘कर्ज’ आणि ‘आजार’चं ‘संकट’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्या व्यक्तीच्या राशीत राहुची एन्ट्री होते त्याच्या आयुष्यात दु:ख येतात. राहु 2020 च्या सुरुवातीपासून 23 सप्टेंबर 2020 पर्यंत मिथुन राशीत राहणार आहे. 23 सप्टेंबर 2020 सकाळी 7.38 मिनिटांनी राहुची चाल बदलणार आहे. यावेळी राहु मिथुन राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊयात राहुचा राशींवर काय परिणाम होणार आहे.

1) मेष –
meshpng

या राशीसाठी राहुचं संक्रमण शुभ संकेत घेऊन येणार आहे. वैवाहिक आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणाकडून धन येणं बाकी असेल तर ते मिळेल.

2) वृषभ-
Vrishabh

या राशीच्या लोकांची आर्थिक तंगी होऊ शकते. कुटुंबाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होणार आहे. कौटुंबिक स्थिती ढासळू शकते. कोणत्याही वादात पडण्यापासून बचाव करा.

3) मिथुन –
mithun
या राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण चांगलं असणार नाही. मानसिक ताण तुम्हाला घेरण्याची शक्यता आहे. आजारपण किंवा इतर कारणांमुळे खर्चांमध्ये वाढ होईल.

4) कर्क –
karka

जर परदेशात जाण्याचा किंवा नोकरीचा विचार करत असाल त र लाभ मिळू शकतो. खर्च वाढण्याचाही योग आहे. ज्या लोकांकडून पैसे येणं आहे ते परत मिळतील.

5) सिंह –
sinha

सिंह राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण शुभ परिणामकारक असणार आहे. तुमच्या उत्पत्नात वाढ होणार आहे. आरोग्यही चांगलं राहणार आहे.

6) तुळ –
tula

यावर्षी तुम्ही भाग्याऐवजी मेहनतीवर भरोसा ठेवा. कारण राहुची वक्र दृष्टी तुमच्या नशीबाचे तारे कमजोर करणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना 2020 मध्ये शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे.

7) कन्या –
kanya

तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील बनते काम बिघडू शकतात. अध्यात्माच्या क्षेत्रात रुची वाढण्याची शक्यता आहे. कर्ज आणि आजारपण सहजतेने पिछा सोडणार नाही.

8) वृश्चिक –
vruchik
जर तुम्ही एखाद्या शोध कार्यात असाल तर तुम्हाला सफलता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती कायम राहिल. वाहन चालवताना काळजी घ्या.

9) धनु –
dhanu

व्यापारात जम बसवणाऱ्यांसाठी हा काळ अजिबात चांगला नाही. कोणत्याही गुंतवणुकीआधी कोणाकडून तरी सल्ला घ्या. पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

10) मकर –
MAKAR

राहुचं संक्रमण तुम्हाला कर्जदार बनवू शकतं. शत्रु तुमच्यावर मात करतील. तुम्हाला तुमच्या कुचक्रापासून वाचणं गरजेचं आहे. मानसिक तणाव राहिल. परंतु मोठ्या आजारपासून दूर राहताल.

11) कुंभ –
kumbha

तुमच्या मुलांचं आरोग्य आणि करिअर यासाठी राहुचं संक्रमण चांगलं असणार नाही. विद्यार्थी आणि नोकरदारांवर याचा प्रभाव जास्त पडेल. आरोग्य बिघडेल आणि कर्जातून मुक्ती मिळणं अवघड होईल.

12) मीन –
min

मानसिक आजार कुटुंबातील लोकांना घेरू शकतात. राहुची चाल तुमच्या सुखांवर भारी पडणार आहे. कर्ज आणि आरोग्यासाठी हे संक्रमण चांगलं असणार नाही.

राहुचा उजवा भाग काळ तर डावा भाग सर्प आहे. वेदांचं अध्ययन केलं तर राहु एक सर्प आहे. सर्पाच्या तोंडातून सदैव विष येत असतं. राहु जेव्हा कोणावर प्रसन्न होतो तेव्हा त्याला जगातील सर्व सुखे मिळतात. राहु क्रोधित झाला तर त्या व्यक्तीला मृत्यू किंवा मृत्यूसमान त्रास सहन करावा लागतो.
2020 में राहु की चाल से खतरा, 4 राशियों पर कर्ज-बीमारियों का संकट
कसं टळेल राहुचं संकट ?

राहु भगवान शिवशंकरांचा परम उपासक आहे. म्हणून, जेव्हा राहु ग्रह विघ्न आणत असेल, तेव्हा त्या लोकांनी शिवशंकराची पूजा करावी. राहु काही उपाययोजना करून शांत होऊ शकतो.

1) शिवशंकराची मनापासून आराधाना करावी.

2) सोमवारी व्रत केल्यानंही शंकर प्रसन्न होतात. सकाळी आराधना केल्यानंतर सायंकाळी शिवशंकरांना दीपक लावायला हवा. यानंतर सफेद भोजन, खीर, मावा मिठाई, दुधाने बनलेले पदार्थ सेवन करावेत.

3) रोज भगवान शंकरांना बेल पत्र वाहून दुग्धाभिषेक करावा.

4) शिवपुराण किंवा कोणत्याही शिवसाहित्याचा पाठ करून संकटांपासून दूर राहू शकता.

5) ॐ नमः शिवाय मंत्राचा जाप वारंवार करत रहायला हवं.

6) – भगवान श्री रामांवर भगवान शिव यांची आस्था आहे. म्हणूनच राम नावाचे स्मारणही तुम्हाला राहुच्या संकटांपासून मुक्ती देऊ शकतं.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/