खुशखबर ! कर्मचार्‍यांच्या पगारात 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2020 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्क वाढ होणार आहे. ग्लोबल अ‍ॅडव्हायझरी, ब्रोकिंग अँड सॉल्यूशंस कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या स‌ॅलरी बजेट प्लॅनिंगच्या रिपोर्टमध्ये ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. निरनिराळ्या सेक्टर्समध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाच्या मदतीनं कंपन्यांना येत्या वर्षात वेतन निश्चित करण्यास मदत मिळणार आहे.

अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात जनरल इंडस्ट्री, केमिकल, हायटेक आणि फार्मास्युटिकल्ससारख्या सेक्टर्समध्ये 10 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. ऊर्जा क्षेत्रात 2019 मध्ये 8.5 टक्के वेतनावाढ झाली होती. त्यातुलनेत 2020 मध्ये 9.3 टक्के वाढ अपेक्षित आहे. फायनॅन्शिअल सर्व्हिसेज सेक्टरमध्ये यावर्षी 9 टक्के वेतनवाढ झाली होती. पुढील वर्षी या क्षेत्रात 9.7 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे.

कंझ्युमर प्रोडक्ट्स सेक्टरमध्ये 2019 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात 9.5 टक्के वाढ झाली होती. 2020 मध्ये या क्षेत्रात वेतनात 9.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. वेतनात 10 टक्के वृद्धीसह भारत एशिया-पॅसिफिक क्षेत्रात अग्रेसर असेल. इंडोनेशियामध्ये 8 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. तर चीनमध्ये 6.5 टक्के, फिलिपिन्समध्ये 6 टक्के आणि सिंगापूर, हाँगकाँगमध्ये 4 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like