‘या’ 3 राशींच्या लोकांचं 2020 हे संपूर्ण वर्षच खराब जाणार, नशीब नाही देणार ‘साथ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्ष लोकांसाठी अनेक आशा – आकांक्षा घेऊन आलं आहे. 2020 काही राशींसाठी लकी असणार आहे तर काही राशींसाठी आव्हानं घेऊन येणार आहे. ज्यां राशींच्या लोकांना आपल्या नशीबाची साथ मिळणार नाही त्या राशी कोणत्या आणि त्यांनी काय काळजी घ्यायला हवी हेही आपण जाणून घेणार आहोत.

1) कर्क राशी – या वर्षात तुमचे अनेक दुश्मन बनू शकतात. खास करून व्यापारात. तुम्ही कोणतेही आव्हान पेलण्यास सक्षम आहात. तुम्ही कौशल्यपूर्वक आपलं काम पूर्ण कराल. तरीही तुम्ही काळजी घेण गरजेचं आहे. कारण दुश्मन तुमच्या एका चुकीची वाट पहात आहेत. या वर्षात तुमच्यासोबत खूप काही घडणार आहे. तुम्ही पूर्ण हिंमतीने त्यांचा सामना करणं गरजेचं आहे.

कोणावरही विश्वास ठेवताना विचार करा. हेच तुमच्यासाठी चांगलं असेल. कारण लोक याचा फायदा घेऊन तुम्हाला नुकसान पोहोचवतील. कोणाही सोबत काहीही शेअर करताना काळजी घ्या.

2) तुळ – या राशीच्या लोकांना यावर्षी अनेक भावनात्मक अडचणीतून जावं लागण्याची शक्यता आहे. प्रेम आणि भावनांनी भरलेलं हे वर्ष तुमची खूप परीक्षा घेणार आहे. या सगळ्यामुळे या राशीच्या लोकांना याची जाणीव होईल की ते किती मजबूत आहेत आणि त्यांची सहनशक्ती किती आहे. वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला दृढतेनं विचार करणं गरजेचं आहे. कोणत्याही दबावात जाण्यापासून स्वत:ला वाचवा. या राशीच्या लोकांना काही चुकीच्या गोष्टींची जाणीव लगेच होईल. परंतु तुम्हाला तुमच्या रस्त्यावरून बाजूला जायचं नाहीये हे लक्षात ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर आपले पत्ते खोला.

3) मेष – जेव्हा बृहस्पती मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा ते मेष राशीसाठी दुर्भाग्य मानलं जातं. यावर्षी तुमच्या नशीबाची साथ तुम्हाला मिळणार नाही. यामुळे तुमची निराशाही होऊ शकते. मेष राशीचे लोक ज्या कोणत्या कामाला सुरुवात करतील ते सुरुवातीलाच खराब होईल. पुढे जाऊन ते काम अयशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे. याच्यापासून वाचण्यासाठी मेष राशीचे लोक अनेक प्रयत्न करतील परंतु तुमची कोणतीही युक्ती कामी येणार नाही. यावर्षी तुम्हाला खूप धैर्यानं काम करणं गरजेचं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –