Shani 2021 : 2021 मध्ये शनीचा तुमच्या राशीवर किती प्रभाव ? ‘या’ 3 राशीवाल्यांनी राहावे सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2021 चा एकुण योग 5 आहे, जो बुध ग्रहाचा अंक आहे. हा शनीचा मित्र अंकसुद्धा मानला जातो. सध्या शनी मकर राशीत आहे आणि 2021 मध्ये सुद्धा राहील. 2021 ची सुरुवात कन्या लग्नमध्ये झाली आहे, ज्याचा सर्वात महत्वाचा ग्रह शनी आहे. यावर्षी शनीचा प्रभाव लोकांच्या करियरवर पडणार आहे. लोकांच्या करियर आणि रोजगाराच्या स्थितीत खुप चढ-उतार राहील. 2021 मध्ये कोणत्या राशींवर शनीची वाकडी नजर राहील आणि कुणाला लाभ होईल ते जाणून घेवूयात…

मेष
या वर्षी प्रामुख्याने शनी तुमच्यासाठी उत्तम राहील. नोकरी आणि पैशांच्या बाबतीत खुप यश देईल. या वर्षात तुम्ही खुप बदलांपासून दूर राहीले पाहिजे. नोकरीत परिवर्तन किंवा नव्या व्यवसायाची सुरूवात करण्यात घाई करू नका.

वृषभ
यावर्षी आपल्यावर शनीचा प्रभाव चांगला राहील. शनी तुम्हाला मालमत्ता आणि वाहन सूख देईल. त्याच वेळी, मोठ्या स्थानांतराचे सुद्धा योग आहेत. रोजगाराच्या बाबतीत मोठ यश संपादन कराल.

मिथुन
शनी या वर्षी संघर्ष आणि कौटुंबिक समस्या देऊ शकतो. बरीच मेहनत घेतल्यानंतरच या वर्षात यश मिळेल. मे महिन्यापासून हळूहळू जीवन सुधारण्यास सुरूवात होईल. पहिले चार महिने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कर्क
शनीची कृपा वर्षभर मिळत राहील. वैवाहिक जीवन, संतती आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. यावर्षी अविवाहित लोकांची लग्न जमण्याची दाट शक्यता आहे. प्रेम विवाहाचे योग आहेत. विवाहित व्यक्तींमधील संबंध मजबूत होतील.

सिंह
करियर आणि वादविवादाची समस्या असू शकते. जमीन किंवा प्रॉपर्टीच्या वादापासून दूर राहणे चांगले. जोडीदाराच्या आरोग्यासाठी काळजी घ्यावी लागेल. पैशाचे व्यवस्थापन आणि दुखापत यावर लक्ष द्या. खर्चामुळे अडचणी वाढू शकतात.

कन्या
शनी या वर्षी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैसा, संतती आणि मालमत्तेच्या बाबतीत स्थिती चांगली राहील. नोकरी-व्यवसायातील दीर्घकाळ असलेल्या अडचणी दूर होतील. यावर्षी करिअर बदलून काही नवीन सुरुवात करू शकता.

तुळ
शनी या वर्षी तुमच्या संघर्षात वाढ करेल. करिअर आणि पैशाच्या समस्या वाढू शकतात. कर्ज आणि खर्चामध्ये आर्थिकतंगी जाणवू शकते. जूनपासून स्थितीत थोडाशी सुधारणा दिसून येऊ शकते.

वृश्चिक
शनीदेव यावर्षी तुमचे करिअर आणि स्थानात बदल करू शकतात. पैशाची आणि सन्मानाची स्थिती ठीक राहील. संपत्ती आणि कर्जाचे प्रश्न सुटतील. मालमत्तेचा फायदा होईल. गुंतवणूकीसाठी सुद्धा अनेक चांगले योग येतील.

धनु
शनीच्या कृपेने कारकीर्दीत बरेच यश मिळेल. घरापासून दूर किंवा परदेशात जाण्याचे उत्तम योग आहेत. वैवाहिक आणि कौटुंबिक बाबतीत अडचणी येऊ शकतात. जोडीदाराच्या वागण्यात चिडचिडेपणा उद्भवू शकतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर
यावर्षी तुमच्या जीवनात मोठे बदल सुरू होतील. संपत्ती, पैसा आणि उत्कृष्ट करिअर या वर्षात शनीमुळे मिळेल. संपत्ती लाभ आणि स्थान परिवर्तनाचे योग आहेत. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ
शनी तुम्हाला मेहनत करायला लावणार आहे. एकंदरीत करिअर आणि पैशाची स्थिती ठीक राहील. परंतु आरोग्य आणि दुखापतीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल.

मीन
शनी करियरच्या बाबतीत यश देईल. यावर्षी तुम्हाला अनेक मोठमोठ्या संधी मिळतील. शत्रू आणि विरोधकांवर मात कराल. दीर्घकाळापासून कुटुंबात असलेल्या समस्या दूर होतील.