2021 हे वर्ष असणार ‘विध्वंसक’, बाबा वेगांची भविष्यवाणी चर्चेत

लंडन : वृत्तसंस्था – बाल्कानची नॉस्रेदस अशी ओळख असलेल्या बाबा वेंगा यांनी 2021 बाबत केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुनसार 2021 मानवजातीसाठी धोकादायक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले होते. बाबा वेंगा यांनी केलेल्या 9/11 चा हल्ला, ब्रेक्झिटसह जगातील काही घटनांबाबत केलेली भविष्यवाणी अचूक ठरल्याचा दावा आजही केला जात आहे.

काय म्हणाले होते बाबा वेंगा
जगात अनेक प्रलय आणि आपत्ती येईल. एक मोठा ड्रॅगन माणसावर ताबा मिळवेल. भविष्यवाणी आणि गूड भाषांमधील तज्ज्ञांच्या मते बाबा वेंगाचा इशारा चीनच्या दिशेने होता. तसेच इंधनावरुन काही गोष्टी सांगितल्या होत्या. पेट्रोलियमचं उत्पादन थांबल्यानंतर ट्रेन सूर्याच्या प्रकाशात हवेत उडतील असे ते म्हणाले होते.

2021 मध्ये कॅन्सरवर औषध
आजारांबाबत वेगा यांनी एक भविष्यवाणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, 2021 मध्ये जगाला कॅन्सरवर औषध मिळेल आणि मुक्तता मिळेल. तसेच आणखी एका घटनेकडे लक्ष वेधताना त्यांनी इशारा केला आहे की, 2021 मध्ये तीन राक्षस एक होतील. यापूर्वी त्यांनी केल्या भविष्यवाणीत 9/11 हल्ला, सोविएत संघ, प्रिन्सेस डायना मृत्यू या घटनांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्यांनी स्वत:च्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.

पुतीन यांच्यावर हल्ला होईल
बाबा वेंगाने डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या भविष्याबाबत संकेत दिले होते. ट्रम्प यांना गूढ आजार होऊन त्यांना ऐकू कमी येईल. तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील कोणीतरी हल्ला करेल असा दावा वेंगा यांनी केला होता.