बिघडणाऱ्या परिस्थितीला ‘डावे’ जबाबदार, 208 शिक्षणतज्ज्ञांनी PM मोदींना पत्राद्वारे सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाविद्यालयांच्या कुलगुरुंसमवेत 208 शिक्षणतज्ज्ञांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशातील बिघडत्या शैक्षणिक वातावरणासाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांना जबाबदार ठरवले आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्हाला असे वाटत आहे की, विद्यार्थ्यांच्या नावाखाली सुरु असलेल्या राजकारणावर एक डाव्या विचारसरणीचा अजेंडा पुढे केला जात आहे. जेएनयू ते जामिया पर्यंत एएमयू ते जाधवपूर विद्यालयापर्यंत नुकत्याच झालेल्या घटना त्यांना डाव्या विचारसरणीच्या छोट्या समूहांच्या कार्यकर्त्यांद्वारा केल्याचे वाटत आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली त्यांच्यात हरि सिंह गौर विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी, दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू एच. सी. एस. राठौर आणि सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू शिरीष कुलकर्णी यांचा समावेश आहे.

208 जणांचे हे विधान शैक्षणिक जगतातील पाठिंबा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न मानला जात आहे. प्रत्यक्षात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यांसह काही विषयांवर काही विद्यापीठांतील निदर्शनांबाबत विद्वानांच्या एका गटाकडून सरकारवर टीका केली जात आहे.

पत्राद्वारे डाव्या विचारसरणीवर निशाणा
डाव्या विचारसरणीच्या गटांचा आढावा घेताना निवेदनात म्हटले आहे की डाव्या राजकारणाने लादलेल्या सेन्सॉरशिपमुळे जनसंवाद आयोजित करणे किंवा मोकळेपणाने बोलणे कठीण झाले आहे. मोदींना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की डाव्या गटांमध्ये संप आणि बंद ही सामान्य गोष्ट झाली आहे आणि डाव्या विचारसरणीच्या अनुरूप नसल्यास लोकांवर वैयक्तिकरित्या निशाणा साधला जात आहे. तसेच यामध्ये गरीब विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत ज्यांची शिक्षणाची संधी अशा गोष्टींमुळे जाऊ शकते.

आम्ही सर्व लोकशाही शक्तींनी एकत्रित येऊन शैक्षणिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारांच्या बहुविधतेसाठी उभे राहण्याचे आवाहन करत असल्याचे देखील सर्व तज्ज्ञांनी पत्रात म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/