Coronavirus : दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2089 नवे रुग्ण, 42 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानी दिल्ली येते कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. शुक्रवारी (दि.10) दिल्लीमध्ये कोरोनामुळे संसर्गाचे 2089 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या कालावधीत या साथीच्या आजारामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी दिल्लीत संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 9 हजार 140 झाले आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3300 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2089 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 2000 हून अधिक रुग्णांची नोंद होण्याचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, 23 जून रोजी सर्वाधिक 3947 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. कोणत्याही एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या होती. यासह कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 9 हजार 140 झाले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे 21146 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 2468 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 84694 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.