शरद पवार आणि PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भेट होणार, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार का ?

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामुळे अनेक पक्षांचे महत्वाचे नेते सध्या दिल्लीत आहेत. राज्यात तर राष्ट्रपती राजवट कायम असताना सत्ता स्थापनेबाबत दिल्लीतून सूत्र हालताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी साडेबारा नंतर संसदेत भेट होणार आहे.

राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची मानली जात आहे. कारण सध्या राज्यात असलेली परिस्थिती आणि आज होणारी बैठक यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे. राष्ट्रवादीकडे असलेले आमदारांचे संख्याबळ जरी कमी असले तरी ते निर्णायक ठरणार आहे. त्या अनुषंगाने दिल्लीत नेमकी सत्ता स्थापनेबाबत काय खलबते होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संसदेत चांगलेच कौतुक केले होते त्यामुळे आता शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप शरद पवारांना जवळ करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याच अनुषंगाने दिल्लीत पवार आणि मोदींमध्ये काय महत्वाची खलबते होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान राष्ट्र्वादीबाबत संसदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पहिल्याच भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेडी पक्षाचे चांगलेच कौतुक केले. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, आज मी राष्ट्रवादी आणि बीजेडी या दोन पक्षांचं विशेष कौतुक करत आहे कारण यांनी संसदेचा कधीही नियम भंग केलेला नाही त्यामुळे इतर पक्षांनी सुद्धा यांच्याकडून ही बाबा शिकण्यासारखी आहे. अशा शब्दात पंतप्रधानांनी राष्ट्रवादी आणि बीजेडीचे कौतुक केले होते. राष्ट्रवादीच्या राज्यातील विधानसभेच्या जागांची आकडेवारी लक्षात घेता किंगमेकर असलेल्या राष्ट्र्वादीबाबत मोदींनी केलेल्या कौतुकाने राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

Visit :  Policenama.com