Alert ! प्ले स्टोअरवर ‘या’ 21 गेमिंग Apps बाबत जारी झाला इशारा, ताबडतोब करा फोनमधून डिलीट, येथे चेक करा लिस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेमिंग अ‍ॅप्सची आवड असणार्‍या यूजर्सने सतर्क व्हावे, अशी बातमी आहे. सायबर सिक्युरिटी फर्म अवास्टने गुगल प्ले स्टोअरवरील 21 अ‍ॅडवेयर गेमिंग अ‍ॅप्सबाबत इशारा जारी केला आहे. सायबर सिक्युरिटी कंपनीनुसार हे 21 अ‍ॅप्स हिडेन अ‍ॅड्स फॅमिली ट्रोजनचा भाग आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्या गुगल अजूनही अ‍ॅडवेयर गेमिंग अ‍ॅप्सच्या रिपोर्टचा तपास करत आहे. सेन्सर टॉवरच्या देण्यात आलेल्या डेटामध्ये म्हटले आहे की, हे 21 अ‍ॅप अ‍ॅप स्टोअरवरून एकुण 80 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत.

अवास्टचा दावा आहे की, यापैकी अनेक अ‍ॅडवेयर गेमिंग अ‍ॅप्सचे प्रमोशनल कंटेंट युट्यूब आणि बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून आले होते. गुगल प्ले स्टोअरवरून हे डाऊनलोड केल्यानंतर त्या गोष्टी दाखवत नाही, ज्या हे प्रमोट करत असतात, परंतु असे जरूर होते की हे यूजर्सच्या फोनला अनावश्यक जाहिरातीने भरून टाकतात.

येथे चेक करा पूर्ण लिस्ट :
1. Shoot Them
2. Crush Car
3. Rolling Scroll
4. Helicopter Attack – NEW
5. Assassin Legend – 2020 NEW
6. Helicopter Shoot
7. Rugby Pass
8. Flying Skateboard
9. Iron it
10. Shooting Run
11. Plant Monster
12. Find Hidden
13. Find 5 Differences – 2020 NEW
14. Rotate Shape
15. Jump Jump
16. Find the Differences – Puzzle Game
17. Sway Man
18. Desert Against
19. Money Destroyer
20. Cream Trip – NEW
21. Props Rescue

मात्र, यांच्यावर डाटा चोरीचा आरोप लागलेला नाही. या 21 अ‍ॅप्सला 8 मिलियनपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. या अ‍ॅप्सबाबत म्हटले आहे की, अशाप्रकारचे अ‍ॅडवेयरमध्ये अन्य मालवेयरपेक्षा कमी धोकादायक मॅलिशियस कोडसह येतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like