पुण्यात पोलिसांचे ‘रेड लाईट’ कोम्बिंग ऑपरेशन, २१ मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवार पेठेतील रेड लाईट भागामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान २१ मुलींची सुटका केली. तर तीन कुंटणखाना चालक महिलांना त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करून घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली आहे.

बबिता श्रीशैल गायकवाड (वय ४५, चंद्रमणी निवास, बाटा गल्ली, बुधवार पेठ), जरीना मल्लमसाहब सय्यद (वय ४५, रा. आई दादा बिल्डींग, बाटा गल्ली, बुधवार पेठ), ज्योती कट्टीमणी( साईतारा बिल्डींग, बाटा गल्ली, बुधवार पेठ) अशी अटक कऱण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

५ अधिकारी आणि ३५ कर्मचाऱ्यांचा सहभाग
बुधवार पेठेतील रेड लाईट भागात मुलींच्या मनाविरुद्ध त्यांना डांबून बळजबरीने त्यांच्याकडून देहविक्रय करुन घेतले जात असल्याची माहिती एका दुप्त बातमीदारामार्फत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली.त्यानुसार मुख्यालयातील १५ कर्मचारी आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील ५ पोलीस अधिकारी व२० कर्मचारी यांच्या मदतीने रविवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान बुधवार पेठेतील रेड लाईट भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात बाटा गल्लीतील परिसर पोलिसांनी पिंजून काढला.

तीन घरमालक व कुंटणखाणा चालक महिलांविरोधात गुन्हा दाखल
मुलींकडून बळजबरीने देहविक्रय करून घेणाऱ्या तीन महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तर २१ मुलींची सुटका केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांची रवानगी हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’