पालखी बंदोबस्तादरम्यान सराईताकडून १ पिस्टल २१ काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – संत तुकराम महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तादरम्यान बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि २१ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गणेश भीमराव पडळकर (रा. वायसेवाडी, अकोले ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

संत तुकाराम महाराज पालखीच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने बारामती येथे गुन्हेगारांची चेकिंग आणि कोम्बिंग कारवाई करण्यात येत होती. या दरम्यान वायसेवाडी येथील एका सराईत गुन्हेगाराकडे गावठी कट्टा आणि काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वायसेवाडी येथे छापा टाकला असता आरोपीकडून एक गावठी कट्टा, ६ मोठे, १५ लहान जिवंत काडतुसे, एस्ट्रा मॅगझीन असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांना आरोपीला अटक केली असून त्याने काही काडतुसे जवळच्या डोंगरामध्ये वापरली आहेत. त्याने अजून कोणाला हत्यारे दिली आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, रमेश केकान, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, स्वप्नील जावळे, रॉकी देवकाते यांच्या पथकाने केली.

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

युती, आघाडीच्या अडचणी वाढल्या ;वंचित’ यामुळे बदलणार या पाच मतदारसंघांचं गणित

‘सारथी’ संस्थेच्या धर्तीवर OBC विद्यार्थ्यांसाठी तात्काळ संशोधन – प्रशिक्षण संस्था स्थापन करा-संभाजी ब्रिगेड

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय