राज्यातील तब्बल 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य महसूल विभागाने आज (मंगळवारी) राज्यातील 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश शासनाचे सहसचिव मा.आ. गुट्टे यांनी निर्गमित केले आहेत.

बदली झालेल्या उपजिल्हाधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. संदीप मच्छिंद्र कळंबे (उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), मलाड-2 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर – श्री. महाजन यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अजित साखरे (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई अंमलबजावणी-1 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर – श्री. ठाकूर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), जयकृष्ण फड (जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग – श्री. खाडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती स्नेहल भोसले (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर या रिक्‍त पदावर), सतीश वसंत धुमाळ (जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर – श्रीमती भोसले यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती प्रज्ञा बडे-मिसाळ (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर – श्री. अरूण आनंदकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अरूण बाबुराव आनंदकर (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक- श्रीमती बडे-मिसाळ यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रमोद भामरे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे – हुलवळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), तुकाराम हुलवळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव – भामरे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रशांत शेळके (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड – श्रीमती मोतीयळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), निलेश श्रीगी (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्मानाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद – शेळके यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), डॉ. प्रताप काळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्माबाद – श्रीगी यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती दिपाली मोतियळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर – डॉ. प्रताप काळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), भाऊसाहेब जाधव (उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री, जि. औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, हिंगोली – रणवीरकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अनिल खंडागळे (उपजिल्हाधिकारी भूसंपादक (आरपीकेव्ही), अकोला ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वाशिम – हांडे हे दिर्घ रजेवर असल्याने), श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), बुलढाणा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, बुलढाणा – देशमुख यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), संपत खलाटे (उपजिल्हाधिकारी (निवडणूक), गडचिरोली ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर – रिक्‍त पदावर), श्रीमती कल्पना निळ (ठुबे) (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गडचिरोली – खलाटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), सुभाष चौधरी (उपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गोंदिया – श्रीमती आंधळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रविण महिरे (उपजिल्हाधिकारी (सामान्य), वर्धा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वर्धा – रिक्‍त पदावर) आणि घनश्याम भूगांवकर (निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, भंडारा – रिक्‍त पदावर)