गौरवास्पद ! राजस्थानचा मयंक बनला सर्वात तरुण ‘न्यायाधीश’

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरचा मयंक प्रताप सिंह हा तरुण वयाच्या 21 व्या न्यायाधीश बनला आहे. सर्वात तरुण न्यायाधीश बनलेल्या मयंकने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. यावर्षी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची परीक्षाही त्याने पास केली आहे. 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.

मयंक म्हणाला की, विधी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने दिनक्रम तयार केला होता. तो दिवसा 12-13 तास अभ्यास करत असे. नियमित अभ्यासामुळे त्याला हे यश मिळाले. एक चांगला न्यायाधीश होण्यासाठी प्रामाणिकपणा सर्वात महत्वाचा आहे आणि त्याने प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळवले आहे.

जयपूरची मुलगी दुसर्‍या स्थानावर
राजस्थान न्यायिक सेवा परीक्षेत मुलीही मागे राहिल्या नाहीत. जयपूरच्या तन्वी माथूरने या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. राजस्थान न्यायिक सेवा परीक्षा 2018 साठी (RJS) मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला लागला. यानंतर 9 नोव्हेंबरपासून मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. अंतिम निकाल 19 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला.

Visit : Policenama.com