‘रॅम्प वॉक’ करताना MBA च्या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कर्नाटकाच्या बंगळुरुच्या औद्योगिक क्षेत्रातील पीनया मधील एका एमबीए स्टुडेंटला रॅम्पवॉक करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. मृत मुलगी फ्रेशर्स डेसाठी रॅम्पवॉकची प्रॅक्टीस करत होती. पोलिसांच्या मते या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. परंतु अद्याप मृत्यूचे खेर कारण मात्र समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी 21 वर्षीय असून तिचे नाव शालिनी असल्याचे समजत आहे. पीनयाच्या एमआयएमएस कॉलेजमध्ये ती एमबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. रिपोर्टनुसार, शालिनी गुडघ्यावर बसली होती. आपल्या बारीची ती वाट पहात होती. सुरुवातीला सर्वांना वाटलं की, ती थकली असावी. परंतु तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलीस उपायुक्त शशी कुमार म्हणाले, “आपल्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स डे साठी रॅम्प वॉकचा अभ्यास करताना विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. अशी शक्यता आहे की, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. आपली बारी झाल्यानंतर ती स्टेजजवळ येऊ थांबली होती. अचानक ती जमिनीवर कोसळली. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

visit : Policenama.com