21 वर्षाच्या मुलानं मृत्युपुर्वी केलं असं ‘दान’, 3 कुटूंबाच्या आयुष्याला भेटलं नवं ‘वळण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील रॅम मनोहर लोहिया दवाखान्यात उपचारासाठी भरती झालेल्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान केले. दोन किडन्या आणि एक लिव्हर दान केल्याने त्याच्या मुळे तीन जणांना जीवदान मिळाले. हे सर्व अवयव दिल्लीतील एम्समध्ये दान करण्यात आल्याने येथील रुग्णांना त्याचा मोठा फायदा झाला.

21 वर्षीय जसमान या तरुणाला 17 सप्टेंबर रोजी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. छतावरून पडून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचाराचे अथक प्रयत्न केले. मात्र गंभीर जखमी आल्याने तो कोमामध्ये गेला होता. त्यानंतर त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नातेवाईकांनी आणि त्याच्या मोठ्या भावाने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका 42 वर्षीय रुग्णाला त्याची एक किडनी दान करण्यात आली.

दरम्यान, याविषयी बोलताना दवाखान्यातील न्यूरोसर्जन एल एन गुप्ता यांनी सांगितले कि, भारतात मोठ्या प्रमाणात अवयव दान करण्याची गरज असताना अनेक नागरिक आजही अवयव दान करण्यास घाबरतात. तसेच याबद्दल असलेला गैरसमज सुरुवातीला दूर व्हायला हवा. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती देखील पसरवायला हवी.

visit: Policenama.com