जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरु आहे. यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी सिंधी बांधवाकडून 211 किलो चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सुपूर्द केले. तसेच मंदिर उभारणीसाठी सिंधी समाज कधी व केंव्हाही पुढे राहणार असल्याची माहिती आमदार आयलानी यांनी यावेळी दिली.

उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाची संख्या मोठी असून देशभरातील सिंधी बांधव यांची उल्हासनगरावर श्रद्धा व विश्वास आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी देशातील सिंधी बांधवानी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या निधीतून 1 किलोच्या 211 चांदीच्या विटा अयोध्या जन्मभूमी न्यासचे संस्थापक सदस्य चंपक राय यांच्याकडे दोन दिवसापूर्वी सुपूर्द केल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, भाजपा नगरसेवक राजेश वधारीया, मनोज लासी, महेश सुखरामानी, नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी आदी उपस्थित होते. यावेळी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राम मंदिर बनविणाऱ्या कार्यशाळा, हनुमानगडी, सरयू नदी आदींचे दर्शन घेतले.

सिंधी समाजाकडून मोठी मदत जाणार?
देशात नव्हेतर जगात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरात राहतो. राम मंदिर उभारण्यासाठी मोठी मदत देण्यासाठी भविष्यात मोठा कार्यक्रम राबविण्याचे संकेत भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केला. शहरातून मोठी मदत देण्याचा प्रयत्न सिंधी बांधवाचे मदतीने करणार असल्याचे रामचंदानी यांनी सांगितले.