Coronavirus : राज्यात दिवसभरात 2110 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 94.64 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असताना शनिवारी (दि.2) दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या एकूण 2 हजार 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 34 हजार 935 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.64 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज 3 हजार 218 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 38 हजार 854 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 49 हजार 631 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आज 51 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 49 हजार 631 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.56 इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 28 लाख 90 हजार 441 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 38 हजार 854 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.04 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 668 होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.