पाकिस्तान : हिंदू शाळेच्या प्राचार्यांवर हल्ला, 219 दंगलखोरांवर FIR (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमावाने हिंदू शिक्षकावर केलेला हल्ला आणि दंगलीच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी २१८ दंगलखोरांवर तीन प्रकारचे गुन्हे दाखल केले. शिक्षकांवर ईश्वराची(अल्लाह ची) निंदा केल्याच्या आरोपावरून जमावाने हल्ला केला. रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे ही घटना घडली.

विद्यार्थ्याचे वडील अब्दुल अजीज राजपूत यांच्या तक्रारीवरून सिंध पब्लिक स्कूलच्या प्राचार्याविरोधात FIR दाखल झाल्यानंतर रविवारी घोटकी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करत आंदोलकांनी दंगा केला. असा दावा केला जात आहे की शिक्षकाने इस्लामविरोधी टीका केली आहे. दंगल संपल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना मुख्याध्यापकास अटक करण्याची मागणी केली.

अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक (एआयजी) जमील अहमद यांनी पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राला सांगितले की, ‘इशनिंदाच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या दंगलखोरांवर घोटकी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. निदर्शकांनी एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याचे त्यांनी सांगितले.

दंगलखोरांवर हे गुन्हे नोंदवले :

पहिल्या प्रकरणात ४५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ वयस्क आणि २३ अज्ञात आहेत. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला, मंदिराची तोडफोड, दंगली केल्याचा आरोप आहे. दुसर्‍या प्रकरणात दीडशे जणांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यात २३ वयस्क आणि १२३ अज्ञात आहेत. यात रस्त्यावर उग्र आणि हिंसक आंदोलन करणाऱ्यांचा समावेश आहे. तिसर्‍या प्रकरणात २३ जण आहेत, ज्यात ११ अज्ञात आहेत. या एफआयआरमध्ये असे लोक आहेत ज्यांनी रॉयल मार्केटमधील अनेक दुकानांमध्ये चोरी केली होती.

इमारत व पायाभूत सुविधांचे नुकसान करणाऱ्या लोकांविरूद्ध शाळा प्रशासनाने पोलिस प्रशासनाकडे स्वतंत्र तक्रार नोंदवावी असे सांगितले आहे. जेणेकरून चौथी एफआयआर नोंदविला जाऊ शकेल. AIG अहमद म्हणाले की, आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून आता त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. सध्या घोटकी हे स्थान कडक पोलीस नियंत्रणात आहे.

असे आहे प्रकरण :

घोटकीमध्ये सिंध पब्लिक स्कूलच्या हिंदू प्राचार्यांवर एका अल्पवयीन विद्यार्थ्याने ईश्वराविषयी निंदा करण्याचा आरोप केला. या मुलाने दावा केला होता, “उर्दूचा वर्ग चालू असताना मुख्याध्यापक येऊन शिक्षकांना योग्य पद्धतीने शिकवत नसल्याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांनी ईश्वराची निंदा करणारे शब्द वापरले. मी घरी येऊन वडिलांना सांगितले तेव्हा ते मुख्याध्यापकांशी बोलले असता मुख्याध्यापकांनी ते चुकून माझ्या तोंडातून बाहेर आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

You might also like