Gold Price Today : लॉकडाऊनमुळे ऑनलाईन ‘सोने-चांदी’च्या खरेदीवर मिळतेय ऑफर, Gold च्या दरात आजही घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सण आणि लग्नसराईचा सिझन असल्याने अनेकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातच उद्या (शुक्रवार) अक्षय तृतीया आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानले जाते. काही ठिकाणी ऑनलाइन सोनं खरेदीला देखील पसंती दिली जात आहे. काही ठिकाणी ऑनलाइन खरेदीवर खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटच्या मते सोन्याच्या किंमती प्रति तोळामागे 44 हजार 710 रुपये आहेत. ही किंमत 22 कॅरेटची आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 45 हजार 710 रुपये प्रति तोळा आहे.

देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. दरम्यान चांदीच्या दराबाबत सांगायचे झाले तर चांदीचे दर 370 रुपयांना घसरले आहे. 1 किलो चांदीचा दर 71 हजार 130 रुपये आहे. देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर काय आहेत, जाणून घ्या…

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर

दिल्ली – 45,900 रुपये प्रति तोळा
मुंबई – 44,720 रुपये प्रति तोळा
चेन्नई – 44,720 रुपये प्रति तोळा
कोलकाता – 45,800 रुपये प्रति तोळा

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

दिल्ली – 49,900 रुपये प्रति तोळा
मुंबई – 45,720 रुपये प्रति तोळा
चेन्नई – 49,090 रुपये प्रति तोळा
कोलकाता – 49,560 रुपये प्रति तोळा

चांदीचे आजचे दर

दिल्ली – 71,130 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई – 71,130 रुपये प्रति किलोग्रॅम
चेन्नई – 76,000 रुपये प्रति किलोग्रॅम
कोलकाता – 71,130 रुपये प्रति किलोग्रॅम

अक्षय तृतीयेला ऑनलाईन खरेदीवर ऑफर

टाटा ग्रुपच्या प्रसिद्ध तनिष्क या ज्वेलरी ब्रँडकडून तुम्ही ऑनलाइन दागिने खरेदी करु शकता. यावेळी अक्षय तृतीयेला सोनं आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर तब्बल 25 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही www.tanishq.co.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. याशिवाय कल्याण ज्वेलर्सच्या वेबसाईटवरुन तुम्ही सोनं खरेदी करु शकता. अक्षय तृतीयेला कल्याण ज्वेलर्सकडून 15 हजारांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने खरेदी केले आणि बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केले तर 5 टक्के सूट मिळणार आहे.