तब्बल 12 लाख लोकांना रोजगाराची संधी, मोबाइल बनवणार्‍या 22 विदेशी कंपन्याचा प्रस्ताव

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतात पेगाट्रॉन, सॅमसंग, लावा आणि डिक्सॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांनी मोबाइल डिव्हाइस आणि त्याचे पार्ट्स बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारच्य प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह स्कीम अंतर्गत या कंपन्या पुढील 5 वर्षांमध्ये 11.5 लाख कोटींचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे देशात इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंगसाठी प्रोत्साहन मिळेल. अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

’आंतरराष्ट्रीय मोबाइल फोन मॅन्यूफॅक्चरिंग करणार्‍या कंपन्यांनी 15 हजारांपेक्षा अधिक सेगमेंटमध्ये उत्पादनासाछी अर्ज केला आहे.’ यापैकी तीन कंपन्या अ‍ॅपलच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चरर्स आहेत. त्या कंपन्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या आहेत. मोबाइल फोन्सच्या सेल्स रेव्हेन्यूपैकी जवळपास 60 टक्के अ‍ॅपल आणि सॅमसंगचा आहे. त्यामुळे या योजनेनंतर कंपन्यांचा मॅन्यूफॅक्चरिंग बेस अधिक वाढण्याची संधी आहे. कंपन्यांच्या या प्रस्तावानंतर 12 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यापैकी 3 लाख डायरेक्ट तर 9 लाख इनडायरेक्ट नोकर्‍या असतील. असेही रवीशंकर यांनी सांगितले.