Coronavirus : सोलापूरमध्ये आढळले ‘कोरोना’चे 22 नवे रूग्ण तर एका महिलेचा मृत्यू, बाधितांचा आकडा 330 वर

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर येथे आज (गुरुवार) सायंकाळपर्यंत कोरोनाचे तब्बल 22 नवे रुग्ण वाढले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णांमुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 22 झाली आहे. आतापर्य़ंत 106 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज एका दिवसात 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत 65 वर्षीय महिला सूलतानपूर उस्मानाबाद येथील आहे. नई जिंदगीत नातेवाईकांकडे ती 18 मार्चला आली होती. 12 मे रोजी त्रास होवू लागल्याने सिव्हीलमध्ये उपचारासाठी आली. सांयकाळी तिचा मृत्यू झाला.

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांत 181 पुरुष तर 149 महिलांचा समावेश आहे. तर मृत 22 मध्ये 11 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 106 रुग्णांमध्ये 69 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे.

आज वाढ झालेल्या 22 रुग्णांमध्ये

निलम नगर एमआयडीसी -2, कोनापुरे चाळ, रेल्वे लाईम -1, कुमठा नाका -1, नई जिंदगी-1, नवनाथ नगर , एमआयडीसी -3, अशोक चौक – 7, न्यु पाच्छा पेठ – 6 , लष्कर -1 या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सध्या 232 जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत.