COVID-19 रुग्णांच्या मदतीसाठी विठ्ठलनगरमध्ये 22 जणांनी केले रक्तदान

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 24 मार्चपासून उद्योग-धंदे आणि कंपन्यासह सर्वच व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. देशसेवा आणि रुग्णांची गरज ओळखून विठ्ठलनगर- मगरपट्टा-मुंढवा (प्रभाग क्र.22) येथे रक्तदान शिबिरामध्ये 22 जणांनी रक्तदान करून केले. तसेच यावेळी गरजूंना भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा सविता मोरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सविता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्ठलनगर (15 नंबर) येथे जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चव्हाण व श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम वीर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

युवा नेते प्रशांत सुरसे, उल्हास भाऊ तुपे, सतीश जगताप, स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, पल्लवी सुरसे, जयप्रकाश जाधव, विशाल तुपे, स्वप्नील यादव, डॉ. शंतनू जगदाळे यांनी रक्तदान शिबिरप्रसंगी नागरिक आणि रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. तसेच, रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वाटप करण्यात आले.

मोरे म्हणाल्या की, देशात व राज्यात कोव्हिडं 19 मुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाळ्यात रक्ताची कमतरता असते. रक्त मिळविण्यासाठी नातेवाईकांची दमछाक होते. हॉस्पिटल्सची गरज ओळखून प्रभाग क्र.22 मध्ये रक्तदान शिबिरा शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीगणेश मित्र मंडळ, जगदंब प्रतिष्ठान, स्प्रिचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन व पूना ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सचिन (बंडू ) मोरे, अनिल चव्हाण, हितेश घाडगे, सुनील तांबे, प्रशांत गायकवाड, आशिष भूतकर, विजय गवते, अक्षय मोरे, कुमार शितोळे, अभिषेक माने, सोमनाथ मोरे, जावेद खान, सिद्धार्थ थिटे, शुभम ठोंबरे यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.