राज्य सरकारचा मोठा निर्णय, ST समाजाच्या तब्बल २२ योजना धनगर समाजाला लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठक एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला आज मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिल्याने एसटी प्रवर्गाला लागू असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होणार आहे.

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकार अलिकडील काळात मोठे निर्णय घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. धनगर समाज आरक्षणासाठी प्रचंड आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला त्याबाबत आश्‍वासन देखील दिले होते. मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –