श्रेयासाठी भांडणार्‍यांनो २२ गावच्या पाण्यासाठी कधी भांडणार…? 

इंदापूर :  पोलीसनामा ऑनलाईन

 

सुधाकर बोराटे 

खासदार सुप्रिया सुळे या गेल्या आनेक वर्षापासुन बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून इंदापुर तालुक्याचे प्रतिनिधीत्व लोकसभेत करत आहेत. माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताना सलग वीस वर्षे राज्याचे मंत्रीपद उपभोगलेले आहे. तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे गेल्या चार वर्षापासुन इंदापुर तालुक्याचे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करित आहेत. गेल्या कित्येक वर्षापासुन इंदापुर तालुक्यातील २२ गावाच्या पाण्याच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आसून एकही आमदार किंवा मंत्र्याला ते ठामपणे सोडवीता आलेला नाही. परंतु खोट्या आश्वासनांचे गाजर दाखवून वर्षानुवर्षे याच प्रश्नावर इंदापूर तालुक्यातील जनतेची फसवणूक करून मते मात्र यांनी मिळवीली आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1203c4e-ce2d-11e8-979d-07efe8f12ec0′]

प्रत्येक निवडणूक जवळ आली की निवडणूकिच्या तोंडावर २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवीण्याची खोटी आश्वासने तालुक्यातील जनतेला दोन्ही पक्षाकडून दीली जात आहेत. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारून न केलेले काम मीच करून आणले हे तालुक्यातील जनतेला दाखविण्यात येते. यासाठी भुमीपुजन व समारंभातुन एकमेकावर आरोप  प्रत्यारोप करणारे विकासाचे महामेरू यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वसामाण्य जनतेची आजपर्यंत केवळ आणी केवळ दिशाभुल व फसवणूकच चालवीली  आहे.  श्रेय घेण्यासाठी भांडणार्‍यांनो विकासासाठी कधी भांडणार असा खरमरीत प्रश्न सध्या तालुक्यातील जनतेतुन विचारला जात आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवत शिक्षक आणि विद्यार्थांना धमकी

इंदापुर तालुक्यात यंदा पाऊस कमी पडल्याने ऐन पावसाळ्यातच इंदापूर तालुक्यात नागरीकांना पीण्याच्या पाण्यासाठीचे टँकर चालु करण्याची पाळी आली आहे. शेतातील पिके पाण्यावीना जळुन गेल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळ आ वासुन उभा ठाकला आहे. पावसाळ्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदील झाल्याचे चीत्र आहे. त्यातच २०१९ ची  विधानसभा व लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तस तसे इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर राजकीय नेत्यांच्या दौर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी  व भुमिपुजन, उद्घाटन  यासाठी सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात नुसती चढाओढ लागली आहे. परंतु विकास कोणी किती केला व त्याचे श्रेय कोणी घ्यायचे या वादात यांना जनतेच्या दैनंदीन सुविधांबाबतच्या विकास कामांचे भानच राहीलेले नाही.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c82889a9-ce2d-11e8-94b5-e340e1c97525′]

या तालुक्याच्या विकासा ऐवजी २२ गावांच्या पाणी प्रश्नाचे तालुक्यातील दोन्ही नेते राजकारण करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने तालुक्यातील मतदार, जनता आता हुशार झाली आहे. गेली २० वर्षे राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तालुक्यातील लोकांनी  भरभरून मते दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना हा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होता. पण आता निवडणूका जवळ आल्या की  एकमेकांवर आरोप करत इंदापूर तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. जाणून बुजून पाण्याचा प्रश्न भिजत ठेवायचा. तसेच तालुक्याचे प्रतिनिधी आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने  या मध्ये राजकारण करू नये. खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे या तीन्ही नेत्यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडवला पाहिजे.

परंतु जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्या ऐवजी हे नेते आपसातच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून मीच कसा सर्वश्रेष्ठ व काम करणारा आहे हे दाखविण्यासाठी यांच्यातच स्पर्धा लागली आहे.

तुमच्या चांदणी ला चंद्र नाही तर चंद्राचा तुकडा भेट देऊ शकाल 

या नेत्यांकडून सर्वसामान्य जनेतेने यांच्याकडून कसला आदर्श घ्यावा..? याचचे कोडे तालुक्यातील जनतेला पडले आहे. श्रेयासाठी आपसात आरोप, प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेच्या कामासाठी या नेत्यांनी भांडावे असा सूर इंदापूर तालुक्यातील जनतेतून निघत आसून आगामी विधानसभा व लोकसभा या प्रश्नामुळे चांगलीच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. तर आता तरी या नेत्यांना जाग येईल का..? याचे उत्तर आगामी लोकसभा व विधानसभेला जनताच मताच्या रूपाने ठरवून देईल.

[amazon_link asins=’B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1c5d8f6-ce2d-11e8-8f84-53d098be6c6c’]