पुण्यात ट्रकच्या धडकेत २२ वर्षीय आर्किटेक्चर युवतीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या मिक्सर ट्रकची धडक दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाली बसली यामध्या गंभीर जखमी तिचा मृत्यू झाला. हा अपघात मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हडपसर उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि.२) रात्री आठच्या सुमरास घडला. या अपघातात आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्राची सतीश बुजबळ (वय-२२ रा. अँमनोरा टॉवर, हडपसर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची भुजबळ ही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकत होती. ती आणि तीची मैत्रीण श्रुतिका विकास शिंदे दुचाकीवरुन जात होत्या. हडपसर उड्डाण पुलावर पाठिमागून आलेल्या भरधाव मिक्सर ट्रकची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये प्राची खाली पडून ती ट्रकच्या टायर खाली आली. यामध्ये ती जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडला त्यावेळी श्रुतिका शिंदे गाडी चालवत होती. सुदैवाने या अपघातात ती सुखरुप बचावली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.

पुढील तपास मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड करीत आहेत.

जाहिरात