जव्हारमध्ये FB Live करत तरुणाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – जव्हार शहरातील राममंदिर शेजारील इमारतीत राहणार्‍या एका 22 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काल संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वाडा तालुक्यातील नवनाथ बोगे असे त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ जव्हार येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. तो हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये रहायचा. परंतु अचानक त्याने काल संध्याकाळी पंख्यावर गळफास घेत आत्महत्या केली. तत्पुर्वी त्याने आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. त्यामुळे ही घटना कॅमेर्‍यामधे कैद झाली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जव्हार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास जव्हार पोलीस करत आहेत.