युवकानं मंदिरात चक्क जीभ कापून देवाला केली अर्पण

बबेरू : वृत्तसंस्था – एका 22 वर्षीय तरुणाने स्वत:ची जीभ (22-year-old-man-cuts-his-tongue) कापून ती देवाला अर्पण केली आहे. उत्तर प्रदेशातील बबेरू (baberu–uttar-pradesh) येथील भाटी गावात अंधश्रद्धेतून एका धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे

आत्माराम (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबेरू येथील भाटी गावात मंदिर आहे. या मंदिरात 22 वर्षीय आत्माराम या तरुणाने शनिवारी स्वत:ची जीभ कापली आणि देवाला अर्पण केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी धाव घेत त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आत्माराम याने हे कृत्य गावातील इतर तरुणांच्या सांगण्यावरून केल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. आत्मारामचे मानसिक आरोग्य ठीक नसून, त्याने नऊ दिवस उपवास केले होते. काही जणांच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले, असे त्यांनी पोलिसांनी सांगितले.

You might also like