इंदापूर : सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सासरच्या जाचाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर दोन येथील अमृता राजेंद्र शिंदे वय २२ वर्षे या विवाहित महिलेने विष प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबतची फिर्याद विवाहित महिलेचे वडिल परमेश्वर दत्तू राऊत राहणार करकंभ तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांनी इंदापूर पोलिसात दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मुलीचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून तिला इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर 2 येथे दिले होते. तिला अडिच वर्षाचा एक मुलगा व सात महिन्याची एक मुलगी आहे. तिला सासरच्या मंडळींकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. याबाबत मुलीने माहेरी आल्यानंतर व फोन वरती ही वेळोवेळी आम्हाला तिला जाच व त्रास दिल्याचे सांगितले होते.

आठ सप्टेंबर रोजी मुलीच्या सासऱ्याचा मला फोन आला व त्यांनी मला तातडीने गलांड्वाडीला येण्यास सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या जावयाचा फोन आला व तुमच्या मुलीने विष प्यायले असून तिला इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तुम्ही दवाखान्यातच या असे सांगितले मी तेथे गेल्यानंतर मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती.

तिला पुढील उपचारासाठी आम्ही सोलापूर येथे घेऊन गेलो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे माझ्या मुलीला सासरच्यांनी जाचहाट केल्याने तिचा नवरा राजेंद्र भगवान शिंदे, सासरे भगवान यशवंत शिंदे, रुक्मिणी भगवान शिंदे( सर्व राहणार गलांडवाडी नंबर 2 तालुका इंदापूर )यांच्याविरुद्ध जाच हाट करून आत्महत्येस प्रवृत्त केल्यास बद्दल त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like