2 महिलांची हत्या झाली ‘तिथं’ होते 2200 मोबाईल नंबर ‘अ‍ॅक्टीव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कैराना शहरात अद्यापही दोन महिलांच्या हत्येचे रहस्य उघडलेले नाही. अजूनही त्या दोन महिलांची ओळख सुद्धा पटलेली नाही. सहारनपूर विभागातील डीआयजी यांनी कैरानामधील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी बीटीएस तंत्रज्ञानाने घटनास्थळी 2200 मोबाइल नंबर सक्रिय शोधले आहेत. या नंबरांच्या रेंडम तपासणीवर पोलिस सुगावा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रविवारी संध्याकाळी 6 वाजता डीआयजी उपेंद्र अग्रवाल जगनपुरच्या जंगलामध्ये घटनास्थळावर पोहचले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेनंतर शेतीच्या बाहेर एक कृत्रिम कानातले आणि बेल्टचा तुटलेला बिल्ला तिथे आढळला. डीआयजी उपेंद्र अग्रवाल, एसपी विनीत जयासवाल शेतात त्या जागेवर पोहचले जिथे दोन महिलांचा मृतदेह सापडला होता. तेथून रस्त्यापर्यंत त्यांनी पुर्ण क्षेत्राची पाहणी केली आणि एसपीला आवश्यक निर्देश दिले. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी फॉरेंसिक चौकशी केली आहे. डॉग स्क्कॉड देखील आणले गेले होते. मात्र आत्तापर्यंत कोणताच पुरावा हाती लागला नाही.

आता पोलिसांच्या मोबाईल सर्विलांस टीमने बीटीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घटनास्थळाच्या आसपास चालू असलेल्या मोबाईल नंबरांचा डेटा घेतला आहे. पोलीस अधिकारी यशवाल धामा यांनी सांगितले की, स्वॉट टीमव्यतिरिक्त सर्विलांसची टीम व पोलिसांची चार टीम या प्रकरणामध्ये काम करीत आहे.

पोलिस 2200 मोबाईल नंबरांची चौकशी करत आहे आणि आणखी पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी जगनपुरच्या जंगलामध्ये आढळलेल्या दोन महिलाच्या मृतदेहाच्या तपासणीनंतर त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी अज्ञात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहाला शामली मोर्चरीमध्ये ठेवले गेले होते. नियमानुसार, 72 तास झाल्यानंतरही यांची ओळख पटू शकली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दोन्ही मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्यात आले.