काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये पुणे-बेंगळूरू महामार्गावर तब्बल 23 लाखांची विदेशी दारू जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-बंगळुरू महामार्गावर कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या विनापरवाना विदेशी दारूची मालवाहतूक करणाऱ्यांना कासेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रॉक फोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रेअर व्हिस्की या विदेशी बनावटीच्या २३ लाख रुपयांची दारू व १५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी जप्त केला आहे.

कोरोना विषाणू संबंधित लॉकडाऊन दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वात मोठी कार्यवाही कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाने दाखवलेल्या खबरदारी पणा मुळे झाली. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्यामुळे प्रत्येक जिल्हा हद्दीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी साडे आठ च्या सुमारास साताऱ्याहून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सांगली जिल्ह्यात जबरदस्तीने प्रवेश केला व पुढे मार्गस्थ झाला. त्यावेळी बंदोबस्ता साठी तैनात असलेल्या पोलिसांकडून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवता पुढे घेऊन गेला. तेव्हा कासेगाव पोलिसांनी महामार्गावरून त्याचा पाठलाग करत ट्रकला पकडण्यात आले. यावेळी ट्रक ची तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी बनावटीची दारू असल्याचे आढळून आले. यामध्ये रॉकफोर्ड रिझर्व्ह व्हिस्की ७५० मिलीचे एकूण सहाशे बॉक्स (रक्कम २३ लाख १७ हजार ९३८ रुपयांची दारू) व आयशर ट्रक (रक्कम १५ लाख रुपये) असा एकूण ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी हस्तगत केला.

ट्रक चालक मुनीर ओंकार गिरी (वय, ३५. रा. उत्तरप्रदेश) व क्लीनर इरफान अब्दुल कादिर (रा. उत्तरप्रदेश) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नवे असून ही दारू घेऊन हे दोघे ट्रक गोवा राज्याकडे घेऊन चालल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्यावर बंदी काळातील दारू ही जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक वस्तू सेवांमध्ये येत नाही हे माहिती असताना देखील सांगली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग, संचार बंदी काळातील बेकायदेशीर वाहतूक सुरू ठेवल्याप्रकरणी ट्रक चालक व क्लीनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप पाटील, ज्योती आपुगडे, कासेगाव पोलीस कर्मचारी व विशेष पोलीस अधिकारी यांनी ही कारवाई केली.