Coronavirus : राज्यात 23 नवे ‘कोरोना’बाधित, एकूण संख्या 891 ; मुंबईमध्ये 10 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सकाळी २३ नव्या कोरोना बाधितांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ८९१ वर पोहचली आहे. त्यात मुंबईतील १०, पिंपरी-चिंचवडमधील ४ जणांचा समावेश आहे. अहमदनगर ३, नागपूर २, सांगली व ठाणे येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपर्यंत ५२६ जण बाधित होते, त्यांची संख्या आता ५३६ झाली आहे. पुण्यातील देखील कोरोनाबाधितांची संख्या आता वाढली आहे. अहमदनगरमध्ये २३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आज आणखी नवीन तिघा जणांची भर पडली आहे.

सोमवारी दिवसभरात राज्यात १२० जण नव्याने बाधित झाल्याचे आढळून आले होते. त्यात मुंबईतील ६८ आणि पुण्यातील ३७ जणांचा समावेश होता. आज दिवसाच्या सुरुवातीलाच १० जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहे. दिवसभरात आणखी नवीन रुग्णांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

You might also like