‘वंचित’, MIM मुळे आघाडीला 23 जागांवर ‘फटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम यांनी आघाडी केली होती. त्याचा राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. विधानसभेत मात्र, त्यांची जागावाटपातील वादातून युती होऊ शकली नाही. दोघांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले. एमआयएमने २ जागा मिळविल्या. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितला भोपळा फोडता आला नसला तरी दोघांमुळे आघाडीला तब्बल २३ जागांवर फटका बसला. या २३ जागा निवडून आल्या असत्या तर राज्यातील चित्रच बदलून गेले असते. त्यामुळे वंचित व एमआयएमला भाजपाची बी टीम म्हटले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही या दोघांमुळे २३ जागा गमावल्याचे सांगितले. त्यात काँग्रेसला १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागांवर फटका बसला.

काँग्रेस : चिखली, खामगाव, अकोला पश्चिम, धामणगाव रेल्वे, चिमुर, राळेगाव, अर्णी, फुलर्बी, चांदिवली, शिवाजीनगर, पुणे कँटोंमेट, तुळजापूर

राष्ट्रवादी काँग्रेस : चाळीसगाव, जिंतूर, घनसावंगी, पेठ, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, माळशिरस.

Visit : Policenama.com