‘NPR’ साठी तुमच्याकडे मागितली जाणार 23 प्रकारची ‘माहिती’, 2010 मध्ये दिल्या होत्या 16 ‘सूचना’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरसंबंधित जी व्यापक माहिती तयार होईल, त्यात लोकांना 23 प्रकारची माहिती द्यावी लागेल. यापूर्वी 2010 मध्ये जेव्हा एनपीआर तयार झाला तेव्हा 10 सूचना मागवण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने स्पष्ट कले की यावेळी एनपीआरमध्ये बायोमॅट्रिकची माहिती लागणार नाही, तसेच लोकांकडून जमा करण्यात आलेल्या माहितीवर कोणतेही ओळखपत्र जारी करण्यात येणार नाही. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर देशातील सामान्य रहिवाशांची एक व्यापक माहिती आहे. हे नागरिकत्व अधिनियम 1955 च्या तरतूदी अंतर्गत आणि नागरिकत्व नियमावली, 2003 मध्ये निहित प्रक्रियेच्या आधारे तयार केले जात आहे. मागील काही दिवसापूर्वी एनपीआरसंबंधित अनेक भ्रम निर्माण झाले आहेत. जसे की लोकांकडून बायोमॅट्रिक माहिती जमा केली जाईल. त्यांना एक ओळखपत्र देण्यात येईल. गृह मंत्रालय एनपीआरचा एक अर्ज तयार करत आहेत ज्यात बायोमॅट्रिकची माहिती आणि ओळखपत्र याची माहिती जमा करण्याची कोणतीही तरतूद नाही.

एनपीआर 2010 मध्ये मागण्यात आली होती माहिती –
व्यक्तीने नाव, कुटूंब प्रमुखाशी संबंध, वडीलांचे नाव, आईचे नाव, पती पत्नीचे नाव, लिंग, जन्म तारीख, विवाहित की अविवाहित, जन्म स्थळ, राष्ट्रीयत्व, पत्ता, स्थायी निवास, व्यवसाय आणि शैक्षणिक योग्यता यांचा समावेश होता. याशिवाय यूआयडीएआयच्या माध्यमातून आधार नंबर तयार करण्याच्या उद्देशाने 5 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचे ओआरजीआयला काही राज्यात तीन बायोमॅट्रिक वस्तुत फोटो, 10 बोटांचे छाप आणि डोळ्याचे स्कॅन एकत्रित केले गेले होते.

एनपीआर 2020 चे परिक्षण –
आधार नंबर, मोबाइल नंबर, पॅन, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र (पासपोर्ट) क्रमांक, मागील निवासाचा पत्ता, सध्याच्या निवासाचा पत्ता, वडील – आईचे जन्मस्थान आणि जन्म स्थिती. एनपीआरला 2010 मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आले होते, यानंतर जेव्हा जन्म, मृत्यू आणि प्रवासाचे कारण याचा समावेश होता. याला पुन्हा अपडेट करण्याची आवश्यकता आहे. परंतु 2015 दरम्यान काही घटनांना अपडेट करण्यात आले होते.

एनपीआरमध्ये कुटूंबाची तसेच वैयक्तिक जनसंख्याचे विवरण सहभागी आहे. विविध जन कल्याण आणि लाभार्थी उन्मुख सरकारी योजनांसारख्या आयुष्यमान भारत, जन धन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जवला योजना, सौभाग्य योजना, लोक वितरण प्रणाली (पीडीएस) इत्यादी कुटूंबासंबंधित योजना. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी एनपीआरच्या आकडेवारीची उपयोग केला जाऊ शकतो.

यासाठी एक मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाईल. आकडेवारी जमा करणाऱ्यांना प्रत्येक घरी पाठवणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपला डेटा अपडेट करु शकणार नाही. याशिवाय घरोघरी गणना केल्याने हे सुनिश्चित होईल की संपूर्ण लोकसंख्या यात सहभागी झाली आहे. सरकारने स्पष्ट केले की एनपीआर अपडेट करताना घरोघरी जाऊन कोणतीही कागदपत्र जमा केली जाणार नाहीत.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/