इंटरनेटचा डेटा संपविल्याबद्दल 23 वर्षांच्या युवकाने धाकट्या भावाची केली हत्या; छातीवर केले अनेक वार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल हे आज गरजेबरोबर एक व्यसनही बनले आहे आणि या व्यसनामुळे मुले बर्‍याचदा मोठी पावले उचलतात. राजस्थानमधील जोधपूरमधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 23 वर्षीय तरुणाला मोबाईल डेटा संपणे, इतके खटकले की त्याने आपल्या छोट्या भावाच्या छातीत चाकूने अनेक वेळा वार करून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे.

काय होतं प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी रमण आपला धाकटा भाऊ रॉयला गच्चीवर घेऊन गेला. येथे त्याने रॉयला मोबाइल इंटरनेट डेटा संपविल्याबद्दल फटकारले. पोलिसांनी सांगितले की, या रागाच्या भरात रमणने रॉयच्या छातीवर 4 ते 5 वेळा वार केले आणि तो तेथून पळून गेला. बुधवारी रात्री घरातील व्यक्तींनी रॉयला छतावर रक्ताने भरलेल्या अवस्थेत पहिले. त्यानंतर रॉयला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे.

उत्तर प्रदेशमध्येही घडले असेच एक प्रकरण
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या गढौली गावात 16 वर्षांच्या मुलाने वृद्ध दाम्पत्यावर दगडफेक करून हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय श्रीनाथ मौर्य 65 वर्षांची पत्नी मैना देवीसमवेत व्हरांड्यावर विश्रांती घेत असताना ही घटना घडली. मृतदेह पाहून घराजवळ खेळणाऱ्या मुलांनी याची माहिती इतर लोकांना दिली. एसपी सुधीरकुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी आणि मृतक दोघेही एकाच गावचे आहेत.