२३० वनपालांना प्रतिक्षा ‘पदोन्नतीची’ ; शासनाचे सीआर मागवले

अमरावती : पोलिसनामा ओनलाईन- गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील २३० वनपाल पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील ११९ वनपालालांना जुलै अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

आयएफएस लॉबीला विनाविलंब पदोन्नती देण्यासाठी राज्यातील वनविभागात वरिष्ठ वनाधिकारी तत्पर असतात. मात्र, या अधिकाऱ्यांना राज्यस्थरावर बढती देण्यासाठी वेळकाढू धोरण आखले जात आहे. गेल्यावर्षी ७५ वनपरिक्षेत्र अधिका-यांना सहायक वनसंरक्षक या पदावर बढती देण्यासाठी दोन वेळेस विभागीय बढती समितीच्या बैठका झाल्या. मे २०१९ मध्ये ७५ वनपरिक्षेत्र अधिका-यांना बढती मिळाली.

३३ कोटी वृक्षलागवडीचे दिव्य स्वप्न पार पाडत असताना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची पदे पदोन्नतीने त्वरीत भरण्याबाबत सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनप्रमुखांना दिल्या आहेत. आणि ११९ वनपरिक्षेत्र अधिका-यांनाची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला मंजुरी मागितली आहे. त्यामुळे ही पदे वनपालांना पदोन्नती देऊन तात्काळ भरण्यात येणार आहेत.

वनपालांची पदे भरताना मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल, मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण तसेच विभागीय चौकशी,  गुन्हे या बाबी तपासून पदोन्नती देण्याचा निर्णय वनविभाग घेणार आहे. २२ वनपालांची गंभीर स्वरूपाची चौकशी सुरू असल्याने त्यांना तूर्तास पदोन्नती मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. हे २२ वनपाल सोडून आरएफओ पदोन्नती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशी माहिती अमरावतीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like